नाशकात जमावबंदीचे आदेश

नाशकात जमावबंदीचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्या महाराष्ट्रात भोंग्यांचे ( Loudspeakar ) वातावरण तसेच वाराणसी येथील ज्ञानवापी मशिद (Dnyanvapi Masjid ) व महादेव मंदिर जागेचा वाद या अनुषंगाने नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था (Law and order in the city) अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naikan)यांनी 15 दिवसांकरिता जमावबंदीचे आदेश लागू केल्याचे परिपत्रक जारी केले.

या परिपत्रकात असे नमूद केले आहे कि, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात दि.29 मे 00.01 वाजेपासून दि. 12 जून रोजीचे 24.00 वाजे पर्यंत 15 दिवसाकरिता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. यामध्ये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असा उल्लेख करण्यात आला आहे.

यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, पेढे वाटणे, फटाके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे. व कुठलेही हत्यार सोबत बाळगण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

जमाव बंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह आदी कारणांकरिता लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com