Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले, चार बसेवर दगडफेक

एसटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले, चार बसेवर दगडफेक

एसटी बस कर्मचाऱ्यांच्या (st bus strike)संपाला झुगारून धुळे बस (dhule)आगारातून आज बस सेवा सुरू करण्यात आली. यानंतर चार बसेसवर दगडफेक झाली. त्यात एक चालक जखणी झाला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे (st bus strike)आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

- Advertisement -

धुळे आगारातून सरळ भरतीत निवडलेल्या चालकांच्या माध्यमातून या बस नरडाणा, धनूर अशा ठिकाणी पाठवल्या गेल्या. मात्र पोलीस (police)बंदोबस्त असतानाही चार बसेसवर दगडफेक झाली आहे. या चारही बस वेगवेगळ्या मार्गावर पाठवण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या घटनांमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दगडफेकीच्या या घटनेमुळे आता सुरू झालेली बस सेवा ही पुन्हा बंद होईल, अशी स्थिती दिसून येत आहे.

हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. . तब्बल 14 दिवसांनंतर आज धुळे एसटी आगारातून लालपरी मार्गस्थ करण्यात आली होती. आज सकाळी पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये या बसेस आगाराबाहेर पडल्या होत्या. परंतु या आपल्या मार्गावर जात असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली. त्यामध्ये एक एसटी चालक जखमी देखील झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या