युनोच्या अहवालाने वाढवली भारताची चिंता

युनोच्या अहवालाने वाढवली भारताची चिंता
कराेना रुग्ण

कोरोना व्हायरसबाबत संयुक्त राष्ट्रानं (United Nations) भारताला इशारा दिला आहे. ओमियक्रॉनमुळे (Omicron)देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २.६४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या नवीन ओमियक्रॉन (Omicron)प्रकारात सौम्य लक्षणे आणि कमी गंभीर असल्याचे म्हटले जाते. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात भारतासाठी भयावह इशारा देण्यात आला आहे.

कराेना रुग्ण
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 46,406 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, दिल्लीत 28,867 प्रकरणे नोंदवली गेली. यानंतर कर्नाटकात 25,005, पश्चिम बंगालमध्ये 23,467 आणि तामिळनाडूमध्ये 20,911 रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (second wave) म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटमुळे एप्रिल ते जून दरम्यान 2.4 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीवर झाला, असा दावा यूएनच्या अहवालात (UN report) करण्यात आला आहे. एवढंच नाही तर आगामी काळातही अशीच परिस्थिती लवकरच निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

UN च्या वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स (WESP) 2022 च्या अहवालानुसार,ओमियक्रॉन प्रकारामुळे संसर्गाच्या नवीन लाटा येत आहेत आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com