मथुरा-वृंदावन येथील होळीची अनोखी परंपरा

मथुरा-वृंदावन येथील होळीची अनोखी परंपरा

नाशिक | Nashik

देशभरात होळीचा (Holi) सण साजरा केला जातो. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे, या देशात अनेक परंपरा आणि संस्कृती (Culture) एकमेकांच्या हातात हात घेऊन समाजाची गुंफण एकसंध ठेवतात.

हे वैशिष्ट्ये आपल्या देशात प्रकर्षाने जाणवते, अनेक धर्म, विविध भाषा, असंख्य सन उत्सव हे आपल्या देशाचे वैभव आहे. याचे वैभवाचे आकर्षण केवळ एतद्देशीयांनाच नव्हे, परदेशीयांनाही आहे.

देशात वेगवेगळ्या भागात त्या-त्या सांकृतिक इतिहासानुसार (Cultural history) तेथील उत्सवांचे वेगळेपणही असते, हे वेगळेपण होळी या सणाबाबत प्रकर्षाने दिसून येते, तसे बघायला गेले तर होळी हा सण देशभरात कमीअधिक प्रमाणात वैशिष्ट्येपूर्ण साजरा केला जातो, पण ; होळीची खरी मज्जा लुटली जाते ती उत्तरेकडील राज्यांमध्ये, ‘बुरा न मानो, होली है |’ म्हणत एकमेकांवर रंगांची उधळण करत या सणाला साजरे केले जाते.

मथुरा-वृंदावन येथील होळीची अनोखी परंपरा
आमदार सत्यजित तांबेंचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, आपण काय...

 पण सर्वात चर्चिली जाणारी होळीची परंपरा म्हणून ज्या होळीची चर्चा होते ती म्हणजे मथुरा-वृंदावन येथील होळीची परंपरा. येथे दरवर्षी हजारो लोक एकत्र येतात आणि होळीची जबरदस्त धम्माल करतात; मात्र या होळीचे वैशिष्ट्ये हे आहे की, येथे रंगांची उधळण बरोबरच फुलांची उधळण करून होळी साजरी केली जाते.

मथुरा-वृंदावन येथील होळीची अनोखी परंपरा
रेल्वे इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वृंदावनात (Vrindavan) विशेष करून फुलांनी होळी खेळली जाते. येथील बांके बिहारी मंदिरात हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. बांके बिहारी (Banke Bihari) मंदिर हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन शहरात वसलेले एक वैष्णव हिंदू मंदिर आहे (Vaishnava Hindu temple).

मथुरा-वृंदावन येथील होळीची अनोखी परंपरा
धक्कादायक! अंध विद्यालयातील मुलांना अन्नातून विषबाधा

हे मंदिर बांके बिहारी यांना समर्पित आहे ज्यांना राधा आणि कृष्णाचे एकत्रित रूप मानले जाते. या बांके बिहारी मंदिरात होळीच्या दिवशी राधा आणि कृष्णा यांची वेशभूषा धारण केलेले तरुण तरुणी एका जागेवर स्थानापन्न होतात, त्यांच्यावर आणि त्या मंदिरातील मूर्तीवर तेथील भाविक पुष्पांची उधळण करतात पूर्ण मानेपर्यंत राधा आणि कृष्ण (Radha and Krishna) झाकले जाईपर्यंत ही उधळण केली जाते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यानंतर मंदिरातील पुजारी भक्तांवर तेथील जमलेल्या पुष्पांचा पुष्पवर्षाव करतात. हा क्षण अतिशय मनमोहक आणि तितकाच श्रद्धापूर्ण साजरा होतो. ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे, विशेष म्हणजे देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही काही भाविक हा उत्सव बघण्यासाठी हजर राहिलेले दिसतात. ही वेगळी आणि वैशिष्ट्येपूर्ण परंपरा  मथुरा जिल्ह्यातील वृंदावन शहरात आढळून येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com