Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशयंदाची UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

यंदाची UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. दिवसेंदिवस मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) देखील पूर्व परीक्षाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

UPSC तर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती आयोगातर्फे देण्यात आली आहे. ही परीक्षा २७ जून रोजी होणार होती. ती आता १० ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं.

दरम्यान आज UPSC ने या परीक्षा लांबणीवर टाकण्याबाबतचं पत्रक जारी करताना देशातील करोना परिस्थितीचा दाखला देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे म्हटलं आहे. ही परीक्षा ७१२ रिक्त पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये २२ रिक्त जागा या दिव्यांगांसाठी देखील आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या