Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाबाबत सतर्क राहा; केंद्राचे पत्र

करोनाबाबत सतर्क राहा; केंद्राचे पत्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना ( Corona ) संसर्गाचा उद्रेक होऊ नये, याकरिता सतर्क राहा(Be carefull ), असे पत्र दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar )यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली. देशात काही राज्यांमध्ये करोना संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. एक्सइ या नव्या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने केंद्राने अभ्यास सुरू केला आहे.

- Advertisement -

आरोग्यविषयक योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. एक्सइ या नव्या व्हेरियंटचा रुग्ण काही दिवसांपूर्वी मुंबईत आढळून आला. याकडे डॉ. पवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्या म्हणाल्या, एक्सइ या नवीन व्हेरीयंटबाबत केंद्र स्तरावर अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासातून जे निष्कर्ष निघतील, त्यानुसार आरोग्य यंत्रणांना मार्गदर्शक सूचना केंद्राकडून केल्या जातील.

दरम्यान, करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच सर्व राज्य सरकारांना पत्र दिले आहे. नवीन व्हेरीयंटच्या शिरकावाच्या अनुषंगाने करोना निदान चाचण्या वाढवाव्यात, जिनोम सिक्वेन्सिंग करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाचा संसर्ग बर्‍यापैकी नियंत्रणात आला असला तरी अजूनही काही राज्यांत करोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच मिझोराम, केरळ सारख्या काही राज्यांचा समावेश आहे. करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ नये, याकरीता सतर्कता बाळगावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या