केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण

मुंबई | Mumbai

देशभरात करोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांपाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली (Nitin Gadkari Tested Corona Positive)आहे. मंगळवारी रात्री त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ( Nitin Gadkari Tweet ) दिली.

गडकरींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. करोनाची लक्षणे सौम्य आहेत. मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मी स्वतःचे विलीगीकरण केले आहे आणि होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चाचणी करून घ्यावी.

नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेतही गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती.

सोमवारीच राजनाथ सिंह यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापाठोपाठ आता नितीन गडकरी यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आजच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही करोना संसर्ग झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com