केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी नाशकात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी नाशकात
नितीन गडकरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) नाशिकमधील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उदघाटनासाठी दि. ३ व ४ ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवार दि. 3 रोजी सायंकाळी ६ वाजता पंचवटी येथील जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय थीमपार्क (Pandit Deendayal Upadhyay Theme Park) लोकार्पण सोहळा व सोमवार दि. 4 रोजी गोविंदनगर मनोहर गार्डन येथे आडगांव नाका ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे (Adgaon Naka to Jatra Hotel Flyover) सायंकाळी ६ वाजता डिजिटल तंत्रज्ञानाव्दारे लोकापर्ण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होणार आहे.

कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister Dr. Bharti Pawar) उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या सोहळयास उपस्थित राहणार असल्याची माहिती पालवे यांनी दिली.

पत्रकार परिषदेस आ. सीमा हिरे, सभागृह नेते कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.