...अन् गडकरींना आली स्टेजवरच चक्कर

...अन् गडकरींना आली स्टेजवरच चक्कर

नवी दिल्ली | New Delhi

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांना एका कार्यक्रमादरम्यान चक्कर (dizzy) आल्याने स्टेजवरच कोसळल्याची घटना घडली आहे...

पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलिगुडी (Siliguri) येथील एका कार्यक्रमात गडकरींची शुगर कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गडकरी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची ECG केली जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, यापूर्वी गडकरींना सभांमध्ये भाषण करतांना दोनदा चक्कर आली होती. तसेच सध्या त्यांची प्रकृती चागंली असल्याचे सांगितले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com