राणेंचे नाशिक पोलिसांना पत्र; 'या' दिवशी राहणार हजर
नारायण राणे

राणेंचे नाशिक पोलिसांना पत्र; 'या' दिवशी राहणार हजर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर नाशिक पोलिसांनी (Nashik City Police) गुन्हा दाखल केल्याने त्यांना २ सप्टेंबर रोजी नाशिकला हजर राहायचे होते मात्र, उच्च न्यायालयाने (High Court) १७ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिल्याने आता केंद्रीय मंत्री राणे २५ सप्टेंबर रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहे. असे पत्र केंद्रीय मंत्री राणे यांनी पाठविल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी सांगितले आहे.

भाजपच्या जन आशीर्वाद (BJP Janashirwad Yatra) यात्रेदरम्यान २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister udhav Thakaray) यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंची तक्रार केली होती.

याप्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी राणेंचा २५ सप्टेंबरला ऑनलाईन जबाब घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री राणे २ सप्टेंबर रोजी नाशिक पोलिसांसमोर हजर राहणार होते. मात्र, गणेशोत्सवाचं कारण देत त्यांच्या वकीलांनी तारीख वाढवून घेतली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी पोलीस त्यांना प्रश्न विचारणार आहे. राणेंच्या उत्तरानुसार पोलीस जबाब नोंदवून घेणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com