Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराणे नरमले! ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकामावर स्वत: चालवला हातोडा

राणे नरमले! ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकामावर स्वत: चालवला हातोडा

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी एक पाऊल मागे घेत स्वत:च्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यातील (Adhish Bungalow) अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) पाडण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांचा जुहू (Juhu) येथे ‘अधीश’ नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) बांधकाम पाडण्यास परवानगी दिली होती. पंरतु राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

दरम्यान, यानंतर सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पाडले जाणार हे निश्चित होते. यानंतर आज स्वत: नारायण राणे यांनी अधीश बंगल्यात तोडकाम करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या