डॉ. भारती पवारांचा राज्य सरकारवर आरोप; म्हणाल्या...

डॉ. भारती पवारांचा राज्य सरकारवर आरोप; म्हणाल्या...
डॉ भारती पवार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) करोना काळात (Corona) संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे...

तसेच राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने (Central Government) काय दिले नाही याबाबत राज्यातील कुणी मंत्र्याने लेखी द्यावे, असेही म्हटले आहे. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिले नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असेही भारती पवार यांनी सांगितले.

डॉ. भारती पवार यांनी महारारष्ट्रातील (Maharashtra) करोना (Corona) स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, राज्य सरकार मागते आणि केंद्र सरकार देत नाही असे राज्यातील कुणी मंत्र्यांनी लेखी दिले तर मलाही बरे होईल.

आम्ही किती निधी दिला आहे आणि त्यातील किती निधी राज्यात खर्च झाला हा पण प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारने आयसीयू बेड, ऑक्सिजनची क्षमता, औषधं यासाठी निधी मंजूर केला आहे.

प्रत्येक जिल्ह्याला औषधांचा साठा उपलब्ध पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधूनदेखील औषधांची मागणी करता येते. आज आपण लवकर काम केले नाही, तर उद्या धावपळ होईल. राज्य सरकारने थोडी गती वाढवावी अशी माझी विनंती आहे, असेही भारती पवार यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.