Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार मुंबई दौऱ्यावर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे शीर्षस्थ नेते म्हणून ओळखले जाणारे अमित शहा ((Union Home Minister Amit Shah )हे गणेशोत्‍सवाच्या Ganesh Festival ) दरम्‍यान मुंबईत येणार आहेत. आपल्या मुंबई भेटीत ते लालबागच्या राजाचे ( Lalbagcha Raja )दर्शन करणार आहेत. शिवाय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

- Advertisement -

अमित शहा हे २०१७ साली भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष झाले. तेव्हापासून ते मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्‍याने निर्बंध होते. त्‍यामुळे त्यांनी दर्शनाला येणे टाळले होते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्‍यामुळे अमित शहा लालबागच्या दर्शनाला येणार आहेत.

नजीकच्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली आहे. मुंबईतील अनेक आमदार तसेच नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. भाजपने मिशन मुंबई आखले आहे.

मुंबई महानगरपालिकेवरील शिवसेनेची सत्ता यावेळी कोणत्‍याही परिस्‍थितीत आपल्या ताब्यात असा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे शहा यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणती रणनिती आखायची याची चर्चा शहा यांच्या मुंबई दौ-याच्या दरम्यान होण्याची शक्‍यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या