केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबई दौऱ्यावर

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्र्यांचा आयोध्या दौरा नुकताच आटोपला आहे. या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजनांसह इतर भाजपचे नेते असल्याने या दौऱ्याला अधिक महत्व प्राप्त झाले होते....

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबई दौऱ्यावर
जे नको होतं तेच झालं! अवकाळीने शेतीचे अतोनात नुकसान; पाहा विदारक परिस्थितीचा Video

या दौऱ्यानंतर आता देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा हे पुढील आठवड्यात म्हणजे (दि. १६ एप्रिल) रोजी मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा (Maharashtra Bhushan Award Ceremony) पार पडणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबई दौऱ्यावर
अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

यावेळी शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच मागील तीन महिन्यात अमित शहा हे दोन वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहे. यामध्ये एकदा १९ फेब्रुवारीला कोल्हापूरात तर दुसऱ्यांदा भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबई दौऱ्यावर
Video : शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव

दरम्यान, तसेच शहा यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय आयटी तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com