अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन
मुंबई | Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आले आहेत. ते आज दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते वांद्रे येथे गेले. अमित शाह यांनी वांद्रे येथे जावून भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते वरळी सी लिंक मार्गाने लालबागच्या दिशेला रवाना झाले. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अमित शाह यांनी आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. शाह दरवर्षी मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. ते यावर्षीदेखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. लालबागच्या राजाची नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. तसेच अनेक सेलिब्रेटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. बॉलिवूडचे कलाकार, मराठी कलाकार तसेच अनेक बडे राजकीय नेते लालबागच्या दर्शनासाठी येतात. अमित शाह यांनीदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.