केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २१ जूनला नाशकात; 'हे' आहे कारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २१ जूनला नाशकात; 'हे' आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारताचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) जागतिक योग दिनी (World Yoga Day) 21 जून रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठ प्रकल्पावर येणार आहेत...

अमित शाह यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभांरंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीबाबत विविध केंद्रीय व स्थानिक सरकारी यंत्रणांनी आज आढावा घेतला. एप्रिल 2022 मध्ये स्वामी सेवा मार्गाच्या सेवेकर्‍यांच्या वतीने चंद्रकांत मोरे आणि डॉ. दिकपाल गिरासे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती.

गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (Gurumauli Annasaheb More) यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्ग संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर सुमारे 10 हजार केंद्राच्या माध्यमातून करत असलेल्या अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याबाबत त्यांना माहिती दिली आणि समर्थ गुरुपीठास भेट देण्याची विनंती केली. सेवामार्गाच्या या विनंतीस मान देऊन शाह जागतिक योग दिनी त्र्यंबकेश्वर नगरीत समर्थ गुरुपीठावर येत आहेत.

या सोहळ्यात अनेक मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी हजेरी लावणार असल्याने याबाबत तयारीचा आढावा विविध यंत्रणांनी घेतला. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप महानिरीक्षक दर्शनलाल गोला, राकेश कुमार, वरिष्ठ अधिकारी पारस नाथ, योगेश कुमार, स्वप्नील पाटील, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कीर्तिका नेगी, त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, मंडळाधिकारी अनिल रोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफाळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com