
नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प २०२३-२४ सादर केला. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा (Modi Government) हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असून मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प होता.
यंदाच्या अर्थसंकल्पात देशाच्या सर्वांगीण विकासाठी सात गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे. तर दुसरीकडे अर्थसंकल्पाच्या वेळी कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील (Whats Costlier What Cheaper) याची लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती.
दरम्यान, यावर्षीच्या अर्थसंकल्पात मोबाईल, टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहने, खेळणी, कॅमेरा लेन्स, सिगरेट, कस्टम ड्युटी या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर सोने-चांदीचे दागिने, विदेशी किचन चिमणी, चांदीची भांडी या वस्तू महाग झाल्या आहेत.