Union Budget 2023: अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा, 'इतक्या' लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त!

Union Budget 2023: अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा, 'इतक्या' लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त!

दिल्ली | Delhi

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब सादर केला. प्रत्यक्षात आयकरात सवलत देण्याची मागणी सातत्याने होत होती. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

Union Budget 2023: अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा, 'इतक्या' लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त!
Union Budget 2023: निर्मला सीतारामन यांची 'पॅन कार्ड'बाबत मोठी घोषणा, आता…

मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा आधीच्या ५ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. वित्तमंत्र्यांनी कररचनेमध्येही फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तर नवी कररचना पुढील प्रमाणे....

३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही

३ ते ६ लाख – ५ टक्के

६ ते ९ लाख – १० टक्के

९ ते १२ लाख – १५ टक्के

१२ ते १५ लाख – २० टक्के

१५ लाखांहून जास्त – ३० टक्के

Union Budget 2023: अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा, 'इतक्या' लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त!
Union Budget 2023 for Farmers: शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये झाल्या 'या' मोठ्या घोषणा, जाणून घ्या कृषी क्षेत्राला काय मिळाले...

ज्येष्ठ नागरिकांसाठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख करण्यात येणार आहे.

Union Budget 2023: अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा, 'इतक्या' लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त!
Union Budget 2023 : अर्थमंत्र्यांची गरिबांसाठी मोठी घोषणा, मिळणार मोफत धान्य
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com