Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2023 : अर्थमंत्र्यांची गरिबांसाठी मोठी घोषणा, मिळणार मोफत धान्य

Union Budget 2023 : अर्थमंत्र्यांची गरिबांसाठी मोठी घोषणा, मिळणार मोफत धान्य

दिल्ली | Delhi

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (budget 2023) सादर केला. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

- Advertisement -

दरम्यान, सीतारामन यांनी देशातील गरीब लोकांना दिलासा देताना मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (Free food grain scheme) एक वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे, अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

Union Budget 2023 for Farmers: शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये झाल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या कृषी क्षेत्राला काय मिळाले…

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे.

करोना महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ८० कोटींहून अधिक लोकांना २८ महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य पुरवण्यात आलं. देशातील कोणीही उपाशी झोपणार नाही असं या मागचं उद्दिष्ट होतं. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही १ जानेवारी २०२३ पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सर्व अंत्योदय आणि कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करणारी योजना राबवत आहोत, असही त्या म्हणाल्या.

Fire : इमारतीला भीषण आग; १० महिला, ३ मुलांसह १४ जणांचा होरपळून मृत्यू

जाणून घ्या या योजनेअंतर्गत कोणाला मिळते मोफत धान्य

योजनेंतर्गत गरिबांना पक्के घर नसावे.

स्वतःची जमीन नसावी.

म्हैस/बैल/ट्रॅक्टर/ट्रॉली नसावी.

निश्चित व्यवसाय नसावा.

कुक्कुटपालन/गाई पालन इत्यादी नसावेत.

कोणताही आर्थिक सहाय्य व्यवसाय किंवा सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत नसावी.

वीज कनेक्शन नसावे.

असे लोक पात्र ठरणार नाहीत ज्यात एक सदस्य देखील आयकरदाता आहे.

अशी कुटुंबे पात्र नाहीत, ज्यांच्याकडे चारचाकी किंवा ट्रॅक्टर आहेत.

घरापर्यंत सोडतो म्हणाला अन्…; धक्कादायक घटनेनं पनवेल हादरलं

- Advertisment -

ताज्या बातम्या