Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2023: निर्मला सीतारामन यांची 'पॅन कार्ड'बाबत मोठी घोषणा, आता…

Union Budget 2023: निर्मला सीतारामन यांची ‘पॅन कार्ड’बाबत मोठी घोषणा, आता…

दिल्ली | Delhi

केंद्रीय अर्थमंत्री (FM) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (India Budget 2023) सादर केला आहेत. जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात नेमका काय घोषणा केल्या जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत.

- Advertisement -

आजच्या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी एजन्सींमधील सर्व डिजिटल प्रणालीसाठी समान ओळख पत्र म्हणून पॅन कार्ड वापरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

Union Budget 2023 for Farmers: शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये झाल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या कृषी क्षेत्राला काय मिळाले…

या निर्णयामुळे KYC प्रक्रिया सुलभ होईल आणि आयकर विभाग आणि इतर सरकारी संस्थांना पॅन कार्डधारकांची कागदपत्रे मिळवणे सोपे होईल अशी अपेक्षा आहे. लवकरच देशात डेटा गव्हर्नन्स पॉलिसी लागू करण्यात येईल. यामुळे केवायसी प्रोसेस सोपी होणार आहे.

नागरिकांना डिजीटल इंडीयासाठी आवश्यक माहिती भरावी लागते त्यासाठी केवायसी प्रोसेस सोपी केली जाणार आहे. नागरिकांचा डेटा डिजीलॉकर सिस्टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Fire : इमारतीला भीषण आग; १० महिला, ३ मुलांसह १४ जणांचा होरपळून मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या