तलावात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू

तलावात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा ( Rasha ) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन सख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उंबरठाण( Umbarthan ) जवळील राशा येथील भुमिका नरेश राऊत वय ११ इयत्ता ४थी, उज्वला नरेश राऊत वय ८ इयत्ता २ री या सख्या दोघी बहिणी अकरा वाजेच्या सुमारास दोघी बहिणी अकरा वाजेच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी येथील गावतळे येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

कपडे धुत असतांना थोरली बहिण भुमिका हिचा पाय घसरल्याने ती बुडाली असता तिला वाचवण्यासाठी उज्वला हिने पाण्यात उडी मारली असता मोठ्या बहिणीला वाचविण्याचा नादात दोघींची घट्ट मिठी पडल्याने दोघींचा तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सदर मृतदेहाचे शवविच्छेदना नंतर पाच वाजेच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. तहसिलदार सचिन मुळीक, नायब तहसिलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दिपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे रतन चौधरी, पांडुरंग पवार, तुकाराम भोये, सुधाकर भोये आदींनी शोक व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com