डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली : ‘अंडरवर्ल्ड डॉन’ अशी ओळख असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशी अफवा आज पसरली. त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये ही बातमी आली. त्यानंतर त्वरीत एम्सकडून छोटा राजनवर उपचार सुरु असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. २६ एप्रिल रोजी त्याला कोरोनाचं निदान झाल्यानंतर नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रशियाने दिली सिंगल डोस व्हॅक्सीनला मंजुरी

२०१५ साली इंडोनेशियात अटक करण्यात आली होती. त्यानंतर छोटा राजन राजधानी दिल्लीतल्या तिहार तुरुंगात होता. मुंबईतील त्याच्याविरोधातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे सीबीआयकडे सोपवली होती. तसेच एका विशेष न्यायालयात या प्रकरणांवर सुनावणी सुरू होती.

छोटा राजनवर मुंबईत खंडणी आणि हत्येचे जवळपास ७० फौजदारी गुन्हे दाखल आहेत. २०११ साली पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आले होते. २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *