Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याझारीतील शुक्राचार्याची अपारंपरिक ऊर्जास्रोतांना आडकाठी

झारीतील शुक्राचार्याची अपारंपरिक ऊर्जास्रोतांना आडकाठी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अपारंपरिक ऊर्जास्रोतांंना (Unconventional energy sources) प्राधान्य देण्यासाठी फक्त जाहीरातीच केल्या जात असून प्रत्यक्षात ग्राहकांना सहकार्यच (Customer cooperation) मिळत नाही. त्यामुळे 80 टक्के ग्राहकांना इच्छा असूनही त्या अपारंपरीक उर्जास्रोतांकडे पाठ फिरविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी विदारक स्थिती सध्या आहे.

- Advertisement -

14 ते 21 डिसेंबर दरम्यान आठवडाभर अपारंंपरीक उर्जा जागृती सप्ताह (Unconventional Energy Awareness Week) साजरा होत आहे. एकीकडे अपांरपरीक उर्जेला नागरिकांनी प्रााधान्य दिले पाहिजे, असे शासकीय स्तरावरुन सांगितले जाते. मात्र जेव्हा सौर उपकरण (Solar equipment) अथवा सोलर वॉटर हिटर (Solar water heater) घेण्यासाठी ग्राहक जातात तेव्हा त्यांना बँकेकडून कर्जासाठी सहकार्य मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. महापालिकेने (Municipal Corporation) घरपट्टीत पाच टक्के सुट दिली तेवढाच फायदा सध्या दिसत आहे.

सौर ऊर्जेचा (Solar energy) वापर करून पाणी तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटर बसवावे लागते. सूर्य किरणांतून ऊर्जा निर्माण होते व ही ऊर्जाच इंधन (Fuel) म्हणून काम करते. या ऊर्जेमुळे प्रदूषणही (Pollution) टळते. अधिकाधिक नागरिकांनी सोलर हिटर बसवावेत यासाठी राज्य शासनाने नाबार्डच्या (NABARD) साहाय्याने 2010 मध्ये या उपकरणांच्या खरेदीवर 30 टक्के अनुदान जाहीर केले. मात्र आता या ग्राहकांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तरी सुध्दा अनुदानावर (Grants) अवलंबुन न राहता जागृत ग्राहक (Aware customers), काही कंपन्या, शाळा (shcool), महाविद्यालये (college), हॉटेल्स (hotels) व्यवस्थापनाने स्वतःहून सौर प्रकल्प बसविले. मात्र त्यांंचे प्रमाण अवघे 20टक्के आहे.

बँकेकडे कर्ज प्रकरणासाठी गेल्यास सहजासहजी दाद मिळत नाही. त्यामुळे सामान्य माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो. दुसरीकडे जे विक्रेते स्वखर्चाने प्रचार प्रसार करतात. त्ंयानाही शासन स्तरावरुन काही सवलती व प्रोत्साहन नाही. त्यांंना व्यवसायासाठी कर्ज लवकर मिळत नाही. ही त्यांची खंत आहे. एकीकडे गॅसच्या किमती वाढत आहेत. विजेचे दर परवडत नसतांंनाही नाईलाजास्तव त्याचा वापर करावा लागत आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोतांना चालना देण्याचा प्रयत्न अशा धरसोड वृत्तीच्या धोरणामुळेच कासव गतीने वाटचाल करत आहे.

अपारंपरिक ऊर्जास्रोतांना चालना देण्यासाठी शासकीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांंना झारीतील शुक्राचार्य आडकाठी घालत आहे की काय अशी शंका येत आहे. सोलर वॉटर हिटरवरील अनुदान शासनाकडे थकल्याने योजनेचा मूळ हेतूच साध्य होत नाही. सोलरच्या हिटरची किंमत आणि त्यावरील 30 टक्के सबसिडी बघितली तर हे स्पष्ट होते की, हिटर 100 लिटर, 200 लिटर, 300 लिटरचे असेल तर त्यांची किंमत अनुक्रमे मूळ किंमत 19,037, 32,991, 68,500 असते.

त्यावर अनुदान 4246, 8492, 19,814, व अंतिम मूल्य 14,794, 24,499, 48,686 रुपया ंपयर्ंंत जाते. वेळेत अनुदान मिळाले, बँकांंनी कर्ज दिले, व्यवसायीकांना शासनाने प्रोसाहन दिले तर 80टक्के वंंचित ग्राहकही त्याचा लाभ घेऊ शकतील. केवळ सप्ताह साजरा करुन हेतू साध्य होणार नाही. त्याला कृतीची जोड द्यावी लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या