अनधिकृतपणे रस्ते खोदल्यास जेलची हवा

मनपा आयुक्तांचा इशारा
अनधिकृतपणे रस्ते खोदल्यास जेलची हवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात ठिकठिकाणी अनधिकृतपणे रस्ते खोदले (Unauthorized digging of roads ) जात असल्याने यातून विद्रुपता वाढतच असून पालिकेचेही नुकसान होत आहे. सुमारे तीस ते पस्तीस टक्के बेकायदेशीरपणे रस्ते खोदून ठेवले आहेत. ही बाब गंभीर असून आता अनधिकृतरीत्या रस्ते खोदताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाऊन प्लॅनिंग या अ‍ॅक्टनुसार कारवाई (Action under Maharashtra Regional and Town Planning Act )करून संबंधित व्यक्तीची थेट जेलमध्ये रवानगी होईल, असा इशाराच महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( Ramesh Pawar )यांनी शहरात बेकायदेशीरपणे रस्ते खोदणार्‍यांना दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी सोमवारी सर्व विभागीय अधिकार्‍यांची बैठक घेत याबाबत त्यांनाही सूचना दिल्या आहेत. रस्ते खोदण्याबरोबर रस्त्याच्या आजूबाजूला होर्डिंगच होर्डिंग लावलेले असतात. मात्र लवकरच यावर नियंत्रण आणले जाणार असून मुंबईच्या धर्तीवर होर्डिंग्ज पॉलिसी ठरवली जाणार आहे. शंभर मीटरवर एक होर्डिंग्ज लावले गेले पाहिजे. याबाबत धोरण ठरवले जाणार आहे. चाळीस ते पन्नास टक्के होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. यात पालिकेचे आर्थिक नुकसान होते. महापालिकेचे भूखंड आहेत. त्या ठिकाणी मोबाईल टॉवर लावून त्यातून पालिकेला कसे उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पालिका आयुक्त रमेश पवार यांनी म्हटले आहे.

महापालिकेत 1900 कर्मचारी आहेत. या सर्वांचा डेटा त्या-त्या विभागाकडे असावा. विशेषत: कामाच्या वेळी अनेकदा सफाई कर्मचारी, शिक्षक व डॉक्टर आदी जागेवर सापडत नाहीत. त्यामुळे या सर्वांची माहिती सहाही विभागीय कार्यालयांतील अधिकार्‍यांकडे असावी.

यापुढे शहरात कोणत्याही विभागात गेलो तर कामाच्या ठिकाणी संबंधित कर्मचारी असायलाच हवा. कर्मचार्‍यांनी रजा घेतली असल्याचे समजले तर विभागीय अधिकार्‍यांची पूर्व मंजूर रजा असावी. कामाच्या ठिकाणी कर्मचारी नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सफाई कर्मचारी, डॉक्टर व शिक्षक यांची लिस्ट असायला हवी.

रोज किती कर्मचारी कामाला येतात. अनेकदा कर्मचारी कामावर येत नसल्याचे चित्र आहे. यापुढे आपण स्वत: शहरातील सहा विभागांपैकी कुठल्याही विभागात जाऊन याबाबतची तपासणी व माहिती घेऊ. पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर सुरू करावी. नाले सफाई, ड्रेनेज इत्यादी कामे पावसाळापूर्व सुरू करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.