मनपाचा थकबाकी वसूलीसाठी 'अल्टिमेटम'

मनपाचा थकबाकी वसूलीसाठी 'अल्टिमेटम'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) वसुली मोहीम (recovery campaign) गतिमान केली असून, ढोल बजाव उपक्रमानंतर आता विशेष मोहीम हाती आहे. त्यात प्रामुख्याने घरपट्टी (house tax) व पाणी पट्टी (water tax) वसूलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या थकबाकी (arrears) मध्ये प्रचंड वाढ झालेली असल्याने प्रशासनाने मध्यंतरी ढोल वाजवण्याच्या भूमिकेतून मोठ्या प्रमाणात वसुली केली होती. तो उपक्रमही आता थांबवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर 31 मार्चपूर्वी थकबाकीचा आकडा शून्यावर आणण्याच्या दृष्टीने मनपायुक्तांनी रजेवर जाण्यापूर्वी सूचना दिल्या होत्या.

मनपाच्या 75 हजार 962 घरपट्टी (house tax) धारकांकडे 353 कोटी 70 लाख रुपये थकबाकी आहे याबाबत मनपा प्रशासनाने सर्वांना सूचना देत थकबाकी भरण्याची मुदत दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत थकबाकीदार पैकी 2383 थकबाकीदारांनी पूर्ण रक्कम तर 2420 थकबाकीदारांनी अंशतः पैसे भरले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात उर्वरित थकबाकी व समीकरणाचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकणार आहे त्या दृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू झाले आहे.

मनपाच्या माध्यमातून 75 हजार 962 घरपट्टी थकबाकीदारांना वसुली बाबत सूचना पत्र दिले होते. त्याल्या प्रतिसाद देत 5 हजार घरमालकांनी आपली थकबाकी भरली आहे. आयुक्तांनी दिलेल्या पंधरा दिवसाची अल्टीमेटम (Ultimatum) दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गाळे जप्तीची कारवाई गतीमान मनपाच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या मनपाच्या गाळेधारकांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसून येत आहे.

मनपाच्या मालकीच्या 2093 गाळेधारकांकडून 49 कोटी रुपये थकबाकी घेणे आहे. त्यापैकी मध्यंतरी प्रशासनाद्वारे 2 कोटी 98 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. वेळोवेळी आवाहन करुनही थकबाकी भरत नसलेल्या 86 गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेतले आहेत. मनपाच्या मालकीच्या 2093 गाळ्यांपैकी पैकी 239 वाटपाविना गाळे रिक्त होते. जप्त केलेले 86 गाळ्यांनंतर आता एकूण 325 गाड्यांचा लिलाव केला जाणार आहे. विभागनिहाय लिलाव प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

गाळेधारकांचा प्रश्न न्यायालयात

गाळेधारक संघटनांनी रेडी रेकनर दराच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी एकूण 110 व्यवसायीकांनी केसेस दाखल केल्या होत्या. त्यापैकी 95 दाव्यांचे निकाल मनपाच्या बाजूला लागले असल्याचे वृत्त आहे.

पाणीपट्टी 60 कोटी थकीत

महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पाणिपट्टी मोठ्या प्रमाणात बाकी वाढली आहे. 60 कोटी थकबाकी असणार्‍या ग्राहकांची वसुली करण्यासाठी एक विभागासाठी दहा प्लंबर नेमण्यात आले आहे या माध्यमातून थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांची थेट कनेक्शन कापले जाणार आहेत मध्यंतरी थकबाकीदारांना केलेले आवाहनानंतर 35 कोटी 31 लाख 77 हजार रुपये वसूल झालेले आहेत.ग्राहकांनी तातडीने पाणीपट्टी भरावी असे आवाहन मनपा प्रशासनाने केली आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com