Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामातृभाषेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वपक्षीयांना साद

मातृभाषेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वपक्षीयांना साद

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची रचना असलेले मराठी भाषा भवन (Marathi language building) व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास यातून मिळावा. तसेच येणाऱ्या पिढ्यांना मराठीची थोरवी समजावी, या हेतूने संकल्पित मराठी भाषा भवन वास्तू असली पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

- Advertisement -

विधान परिषदेच्या (Legislative Council) उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आज विधान भवनात बोलाविलेल्या विशेष बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. मराठी भाषा भवनाच्या प्रस्तावित वास्तूची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली.

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

ते म्हणाले, सर्व मराठी भाषिक नागरिकांनी मुंबईत आल्यावर या वास्तूला भेट द्यावी अशा पद्धतीने याची रचना झाली पाहिजे. आपल्या मातृभाषेसाठी (mother tongue) एकत्र काम करू या, असे आवाहन उद्धव यांनी केले. तर सर्वांच्या सूचना स्वागतार्ह असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सर्वपक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषेचे उपासक म्हणून आपण सर्वांनी मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आपण कार्यरत राहू. महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि मराठी भाषेविषयी माहिती देणारे हे दालन असले पाहिजे, असे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत व्यक्त केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या बैठकीला माजी मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहीर, मनीषा कायंदे, चेतन तुपे, महादेव जानकर, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, निलय नाईक, प्रसाद लाड, धीरज देशमुख, रामदास आंबटकर, अजय चौधरी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, वास्तुविशारद पी. के. दास उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या