महाड मध्ये उद्धव ठाकरे यांची 'शिवगर्जना' सभा; बारसू रिफायनरीवरुन सरकारवर टीका

काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश
महाड मध्ये उद्धव ठाकरे यांची 'शिवगर्जना' सभा;   बारसू रिफायनरीवरुन सरकारवर टीका

महाड |

आज महाड मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शिवगर्जना सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बारसू रिफायनरीवरुन त्यांनी सरकारवर टीका केली. या वेळी काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.

सभेतील भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट अनेकांना वाटलं शिवसेना संपली, संपवली पाहिजे, असंही काही जणांना वाटत आहे. आत्ता तर सभे साठी मैदाने आता अपूरे पडत आहेत. सर्व माझ्यासोबत आले आहेत. काही काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही.

आज तर माझ्याकडे सत्ता नाहीय. आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं आणि स्वत: तिकडे बसले. भाजपने आपलं चिन्ह आणि धनुष्यबाण चोरलं मी आज केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी माझ्याकडे काहीच नाही. तरीसुद्धा तुम्ही एवढे प्रचंड संख्येने आलेले आहात, जगताप कुटुंबिय आले आहेत, अद्वय हिरे आले. आणखी काही जण येणार आहेत. पण असं आश्चर्य याआधी पाहिलं नव्हतं.

महाविकास आघाडी म्हणून मी पुढे जातोय मग मी काँग्रेस फोडतोय का? तसं नाहीय. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार जिंकला, शिवसैनिकांनी मेहनत घेतली. नुसती जिंकून आणण्यासाठी मेहनत घेतली नाही. तर आपला उमेदवार लिंगाडे आपला शिवसैनिक तिकडे दिला आणि तिकडे तो आमदार झाला. कारण एवढ्या एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकूमशाही वृत्ती उभी आहे तिचा पराभव करणार आहोत

महाड मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तो केवळ निवडणुकीपुरता नाही. मी कागदावर लिहून ठेवलं आहे की एकही मतदारसंघ सुटता कामा नये. फटाके सुद्धा शिवसैनिकासारखे एकदा पेटले तर ऐकत नाहीत. म्हणून कोणी शिवसैनिकाला पेटवायचा प्रयत्न करु नये.असेही ठाकरे म्हणाले. तळी गावात दरड कोसळली. किती जणांना घरे मिळाली? दोन वर्ष झाली. माझ्याकडे नावं आहेत. तळीया गावात 71 घरं स्थलांतरीत झाली, त्यातील 66 नष्ट झाली. जेवढी घरं द्यायची होती त्यापैकी फक्त 15 घरं तयार आहेत.

हो, मी बारसूसाठी पत्र लिहिलं होतं. मला खोटं बोलण्याची गरज नाही कारण मी पाप केलेलं नाही. उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन हे नाचत आहेत. यांनी जागा विकली आहे, मलिदा खाल्ला आहे. यादीत सगळे उपरे आहेत. नागोबा आता तिथे मालक म्हणून बसले आहेत. त्यांना तिथे प्रकल्प होणार हे माहिती होतं. जे गद्दार गेले ते माझ्याकडे वारंवार या प्रकल्पासाठी येत होते. त्यावेळी मी विनाशकारी प्रकल्प आहे तर मग गुजरातला जाऊ दे असं म्हटलं होतं. सगळा घटनाक्रम पाहता आपलं सरकार पाडलं आणि तेथून संमती आली. अंतिम मंजुरी मी स्वत: तिथे जाऊन देणार होतो. त्या कंपनीला प्रेझेंटेशन द्यायला लावणार होतो,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण राज्याचं पोलीस दल बारसूमध्ये उतरवलंय ,एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर लावला असता तर चीन देशात घुसला नसता बारसूत गोरगरीब जनतेवर लाठ्या चावतायप्रकल्प एवढा चांगला असेल तर लाठ्या का चालवताजनतेत जाऊन सांगत का नाही हा प्रकल्प तुमच्या हिताचा आहे असे ही ठाकरे म्हणाले.

काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश

मी वडिलांचा हात धरुन राजरकारणात आले, आज त्यांची उणीव जाणवते साहेब, आपण कोरोना काळात केलेल्या कामाचं कौतुक होतं कोरोनाने माझ्या वडिलां हिरावून घेतले, त्यांनी महाडमध्ये कोविड सेंटर सुरु केलं. रुग्णांची काळजी घेत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं अस स्नेहल जगताप म्हणाल्या या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार निवडून येईल असे ही जगताप यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com