Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Satta Sangharsh: 'सत्तेसाठी हापापलेल्या...'; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Satta Sangharsh: ‘सत्तेसाठी हापापलेल्या…’; सुप्रीम कोर्टाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष (Power Struggle) निर्माण झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या याचिकांवर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. या निकालात एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे. मला एका गोष्टीचे समाधान आहे की, मी वारंवार म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल, तर तो आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही? याबद्दलचा असेल. न्यायालयाने (Court) जो निर्णय दिला आहे, त्यामध्ये त्यांनी एकूणच सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची पूर्णपणे चिरफाड केली आहे. असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Satta Sangharsh : राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

तसेच पुढे ठाकरे म्हणाले की, आजच्या निकालातून राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले आहे. राज्यपाल ही यंत्रणा आदरणीय होती, यापुढे राज्यपाल ही यंत्रणा अस्तित्त्वात ठेवावी की नाही हे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवे. पण आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय जरी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळी शिवसेना म्हणजे माझी शिवसेना (shivsena) यांच्याकडेच राहिल. आता अध्यक्षांनी यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करु, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Maharashtra Satta Sangharsh : १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे

ते पुढे म्हणाले की, त्यावेळी माझा राजीनामा (Resignation) देणे कायदेशीरीत्या चूक असेल पण माझी लढाई ही जनतेसाठी आहे. आता देशाला वाचवायचे आहे. नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा. शिंदेंनी मला नैतिकता शिकवू नये. त्यामुळे माझ्याप्रमाणे शिंदे-फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या