राऊतांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, संकटात पाठीशी उभा राहतो, तोच...

राऊतांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, संकटात पाठीशी उभा राहतो, तोच...

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तब्बल १०३ दिवसांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांची जेलमधून काल सुटका झाली. त्यानंतर आज राऊत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला...

यावेळी ठाकरे म्हणाले की, संजय राऊत जेलबाहेर आल्याचा आनंद असून संकटात पाठीशी उभा राहतो, तो खरा मित्र असतो. संजय राऊतांच्या धाडसाचे कौतुक करतो. तसेच न डगमगता जिंकू शकतो, हे राऊतांनी दाखवून दिले असून राऊत शिवसेनेची (ShivSena) लांब पल्ल्याची तोफ असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राऊत म्हणाले की, पक्षासाठी १० वेळा तुरुंगात जाईन. तसेच देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न होत असून पक्ष माझी आई आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com