
नाशिक । प्रतिनिधी Nashik
मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर नाशकातूनही उद्धव ठाकरे शिवसेनेतील (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray )बंंडखोरांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शिवसैनिकांची मोट बांधण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हेच नाशकात दाखल होणार आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ते नाशकात मोठा मेळावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या मातोश्रीवरील भेटीप्रसंगी त्यांनी तसे संकेत दिले.
उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते संजय राऊत हेही त्यापूर्वी आवश्यक रणनीती व पक्षबांधणीसाठी येत्या शनिवार व रविवारी नाशिकमध्ये येणार आहेत. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात तत्कालीन कृषिमंत्रीदादा भुसे, आ. सुहास कांदे व कालांतराने हेमंत गोडसे यांनी सहभाग घेतला. मात्र, प्रवीण तिदमे यांच्या रूपाने शिंदे गटाने पहिला माजी नगरसेवक गळाला लावत त्यांना थेट महानगरप्रमुखपद बहाल केले. संजय राऊत तुरुंगात असताना सर्व घडामोडी सुरू होत्या.
सद्या रिक्त झालेले जिल्हा संपर्कप्रमुख स्थानिक पातळीवर नियुक्त करायचे की मुंबईतून पाठवायचा याबाबतदेखील खा संजय राऊत यांच्याकडून चाचपणी केली जाणार आहे. दिंडोरीचे जिल्हाप्रमुख पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबतदेखील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी राऊत हे सविस्तर चर्चा करणार असल्याचे उद्धव सेनेच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई, ठाणे, औरंगाबादपाठोपाठ नाशिकच्या संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष दिलो जात असून, नाशिकमधील घडामोडींसंदर्भात ’मातोश्री’ येथे उद्धव ठाकरेंची भेट घेऊनचर्चा करण्यात आली.यावेळी उपनेता बबन घोलप, सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे, गटनेते विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकार्यांनी बुधवारी मुंबईत जाऊन मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नाशिकमधील संघटनात्मक स्थिती विशद करण्यात आली.
मंगळवारी राऊत यांच्या उपस्थितीत मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांचे पुतणे युवराज ठाकरे यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर केले गेले नाही. युवराज ठाकरे यांना अजय बोरस्ते यांच्याविरोधात उभे करण्याची रणनीती या माध्यमातून आखण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. आहे. दरम्यान, ठाकरे यांनी प्रत्येक बंडखोरासमोर सक्षम पर्याय द्या, अशाही सूचना दिल्या.