Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याआरे कारशेडच्या निर्णयावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आरे कारशेडच्या निर्णयावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमासमोर आले. यावेळी शिवसेना भवनमध्ये (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद (Press Conferance) घेताना आरे कारशेडच्या बदललेल्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारला भावनिक आवाहनही केलं आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे बोलतांना म्हणाले की, माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसली अस करु नका. तुम्हाला हात जोडुन विनंती, माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मी मुंबईकरांच्या वतीने आरेचा आग्रह रेटु नका असं आवाहन करतो.

तसेच, पर्यावरणाला हानी पोहोचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले, असं उद्ध ठाकरेंनी म्हटलं. आता राज्यात आणि केंद्रात तुमचंच सरकार आहे. कांजूरमार्गचा प्रस्ताव दिला होता. ही जमीन मुंबईकरांची आहे. तुम्ही मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजूरमार्गचा प्रस्ताव कायम ठेवा, मेट्रो अंबरनाथ बदलापूरपर्यंत नेता येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या