Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंना सर्वत्र शिंदे-फडणवीस दिसतात!; बावनकुळे यांचा निशाणा

उद्धव ठाकरेंना सर्वत्र शिंदे-फडणवीस दिसतात!; बावनकुळे यांचा निशाणा

मुंबई । वृत्तसंस्था/प्रतिनिधी | Mumbai

मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सर्वत्र शिंदे-फडणवीस दिसतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी रविवारी नागपूर (Nagpur) येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संताजी धनाजींसारखा शिंदे फडणवीसांचा धसका घेतला आहे. त्यांना ते सर्वत्र त्यामुळे सतत त्यांच्याबद्दल बोलतात, असेही ते म्हणाले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election) भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (BJP candidate Murji Patel) विजयी होतील आणि आपला पराभव होईल, अशी भीती उद्धव सेनेला वाटते. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या निवडणूक अर्जावर (Election application) आक्षेप घेऊन अर्ज रद्द करण्याचे षडयंत्र चालू आहे. पण ते षडयंत्र यशस्वी होणार नाही, असे बावनकुळे यांनी

बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार बनविताना आणि नंतर अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) विचार स्वीकारले आहेत. सावरकरांचा अपमान करणार्‍या काँग्रेसला त्यांनी साथ दिली आहे. त्यामुळे उद्धव सेनेला मत देणे म्हणजे काँग्रेस -राष्ट्रवादीला मत असेल. परिणामी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मानणारा मतदार उद्धव सेनेला मत देणार नाही कारण प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मते मागत असल्याचे त्यांना माहिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यात आज 1,165 ग्रामपंचायतींच्या (gram panchayat) निवडणुकीचे (election) मतदान (voting) होत आहे. त्यांचा निकाल सोमवारी लागणार आहे. त्याविषयी बोलताना या निवडणुकीतही भाजप (BJP) पहिल्या क्रमांकावर असेल आणि भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना युतीला 50 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळेल. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत 608 294 ग्रामपंचायती जिंकून भाजपने पहिला क्रमांक मिळवला होता, असे बावनकुळे म्हणाले.

नागपूर जिल्हा परिषद (Nagpur Zilha Parishad) आणि पंचायत समित्यांची (panchayat samiti) निवडणूक आघाडी सरकार असताना झाली होती. त्यात काँग्रेसला यश मिळाले होते. त्यामुळे स्वाभाविकपणे आता त्यांचे सभापती निवडून येतात. दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमुळे आता होणार्‍या परिणामांची आजच्या संदर्भात चर्चा करणे योग्य नाही. परंतु नागपूर परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या