Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या... तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल नको - उद्धव ठाकरे

… तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल नको – उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत गेले असून त्यावर सुनावणी सुरु आहे. अशातच आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, शिवसेना ही एकच असून मी दुसरी शिवसेना मानत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असल्याने त्यावर आधी सुनावणी झाली पाहिजे. त्याचा निकाल आधी आला पाहिजे, त्यानंतरच निवडणूक आयोगाचा (Election Commission) निकाल आला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने आपला निर्णय देऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Turkey Syria Earthquake : चिमुकलीचे अंग धुळीनं माखलेलं, काहीशी भेदरलेली; ढिगाऱ्याखालून बाहेर काढताच….

पुढे ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) सुनावणी १४ तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. आमच्याकडून आमचं म्हणणं लिखित स्वरूपात सादर केलं आहे. नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. तसेच कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार (MLA-MP) फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्याला गद्दारी म्हणतात, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; दूरपर्यंत धुराचे लोट, परीसरात घबराट

तसेच ते पुढे म्हणाले की, शिवसेनेत मुख्यनेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला त्यांनी शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितले आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार त्यांनी मग काही पदांची निर्मिती केली. त्यात विभागप्रमुख हे पद आहे. आयोगाने ज्या गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र आम्ही सादर केली आहेत. आमची सदस्यसंख्याही आम्ही दाखवली आहे. त्यामुळे अगोदर अपात्रतेचा (Disqualification) फैसला आधी व्हायला हवा, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेपासून; फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

- Advertisment -

ताज्या बातम्या