उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस राज्यात संचारबंदी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस राज्यात संचारबंदी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या घोषणा जाणून घ्या एका क्लिकवर: राज्यात ५४०० कोटी रुपयांची मदत जाहीर

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात उद्या रात्री ८ वाजेपासून निर्बंध अधिक कठोर केले आहेत. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून पुढचे १५ दिवस राज्यात संचारबंदी असणार आहे.

Title Name
cm uddhav thackeray live : ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत मागितली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात निर्बंध घालतोय, पण पर्याय नाही. कडक पावलं उचलावी लागत आहे. याला लॉकडाऊन म्हणत नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत. आता कोरोनाची साखळी तुटायला हवी. पण रोजीरोटी महत्त्वाची आहेच. रोजीरोटीसोबत जीव वाचवायला हवे. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे उद्या १४ एप्रिलपासून रात्री ८ पासून निर्बंध लागू होती, पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल, मतदानानंतर तिथेही लागू होतील.

बँका सुरु रहाणार

पावसाळ्याची कामे पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामे चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार

लोकल सुरु राहणार, बस सुरु राहणार पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.

कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.

तीन किलो गहू मोफत

राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत. रोजी थांबली असली तरी रोटी थांबणार नाही .

नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत देणार

शिवभोजन मोफत

शिवभोजन थाळी १० रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर ५ रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत देणार.

बांधकाम मजुरांना १५०० रुपये मदत

संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये ३५ लाख लोकांचा समावेश आहे.

राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देणार. १२ लाख कामगारांना उपयोग होणार.

परवाना धारक रिक्षा चालकांना १५०० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हे १२ लाख लाभार्थी आहेत.

खावटी योजनेच्या आदिवासी कुटुंबांना २ हजार रुपये देण्यात येणार आहे. हे १२ लाख लाभार्थी आहेत.

फेरीवाल्यांना निधी

नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत.

अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे १५०० रुपये देत आहोत. राज्यात यांची संख्या ५ लाख आहे.

कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी ३३०० कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.

महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात १२ लाख लाभार्थी आहेत. त्यांना १५०० रुपये देणार आहोत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com