उद्धव ठाकरेंनी घेतली राऊत कुटुंबियांची भेट

उद्धव ठाकरेंनी घेतली राऊत कुटुंबियांची भेट

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना ईडीने (ED) अटक (Arrested) केली आहे. राऊत यांना अटक झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आहे...

ठाकरे यांनी राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली आणि कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), शिवसेना आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते.

ईडीने (ED) रविवारी राऊत यांच्या घरावर छापा (Raid) टाकला होता. 9 तास चौकशीनंतर राऊत यांना संध्याकाळी ईडी कार्यालयात घेऊन गेली होती. ईडीच्या कारवाईमुळे राऊत कुटुंबीय तणावाखाली होते. उद्धव ठाकरे राऊत यांच्या घरी पोहोचल्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com