Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री उद्धव ठाकरे देऊ शकतात आज राजीनामा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देऊ शकतात आज राजीनामा?

मुंबई । Mumbai

राज्याच्या राजकारणात कालपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी पुकारलेले बंड यशस्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेनी तब्बल ४० हून अधिक आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाची ही बैठक आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) अखेरची बैठक असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resign) देणार असल्याची माहिती देणार असून त्यानंतर ते आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन सध्या गुवाहाटीमध्ये (Guwahati) मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० हून अधिक आमदारांची फौज असल्याचे बोलले जात आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजपही सतर्क झाले असून भाजप (BJP) नेत्यांना राज्यातील लोटस ऑपेरशन विषयी आणि राजकीय घडामोडींबाबत कोणतेही भाष्य न करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिल्या आहेत. तसेच भाजपची अंतर्गत माहिती बाहेर जाता कामा नये अशी तंबीही फडणवीसांनी भाजप नेत्यांना दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या