Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंनी साधला निशाणा, म्हणाले त्यांचा हेतू चुकीचा..

उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा, म्हणाले त्यांचा हेतू चुकीचा..

मुंबई | Mumbai

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’ वर्धापन दिनाच्या औचीत्त्यावर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने माटुंगा येथील

- Advertisement -

षण्मुखानंद सभागृहात आज शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या विधानभवनात (vidhanbhavan) बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करत असताना त्याच वेळी उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा (shivsainik) मेळावा घेतला त्यामध्ये ठाकरे विद्यमान सत्ताधाऱ्यांवर चांगलेच बरसले.

ते म्हणाले, ‘आज विधानभवनात तैलचित्राचं अनावरण होतंय, बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावत आहे. त्याचा आनंद आहे, पण त्यांचा हेतू चुकीचा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उपस्थितांना बघून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तेच चैतन्य तोच उत्साह तोच जोश आणि तीच गर्दी पाहायला मिळत आहे. गद्दार विकले जाऊ शकतात, पण हे जे आहेत ते खोक्यांनी विकत घेता येत नाहीत.

‘आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आपण एकत्र आलो. काही वर्षांपूर्वी रामदास आठवले आम्ही एकत्र होतो. मात्र, रामदास आठवले भाजपकडे गेले. आता दोन महापुरुषांचे नातू एकत्र येत आहे. आज विधानभवनात तैल चित्राचं अनावरण होतंय. ज्या कलाकारांनी रेखाटले. त्यांना मला काय बोलायचं नाही. तैलचित्र लावत आहेत. त्याचा आनंद आहे, पण हेतू चुकीचा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या