
नागपूर | Nagpur
हिवाळी अधिवेशनात (Winter session) भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनात भ्रष्टाचाराचे आरोप हे सर्व शिंदे गटातील मंत्र्यांवर झाल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य करत शिंदे गटाला सूचक इशारा दिला आहे...
ते म्हणाले की, महाराष्ट्रात टोळींचे सरकार आहे. आज ते आरएसएस कार्यालयात ( RSS office) गेले होते. आरएसएस कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? यांची बुभुक्षित नजर वाईट आहे, आम्ही अनुभव घेतला आहे. ज्यांना स्वत: काही करण्याची धमक नसते, कुवत नसते ते दुसर्यांच्या गोष्टींवर हक्क सांगतात. आरएसएसने काळजी घ्यावी. दुसर्यांचे नेते, पक्ष आणि कार्यालय चोरी (theft) करण्याचे काम यांचे सुरू आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
पुढे ते म्हणाले की, सर्व भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप केवळ शिंदे गटाच्याच मंत्र्यांवरच का होत आहेत हा विचार शिंदे गटातील मंत्र्यांनीच केला पाहिजे. ही प्रकरणं नेमकी कोठून बाहेर येत आहेत आणि कशी बाहेर येत आहेत यावर शिंदे गटाने विचार करावा. हा शोध त्यांनीच घ्यावा. ही भ्रष्टाचाराची प्रकरणं माझ्या सरकारच्या काळात झाले. मात्र, याचा अर्थ माझा त्याला पाठिंबा होता, असे नाही. जेव्हा आरोप झाले तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनामा (Resignation) घेतला. तो मंत्री तेव्हा माझ्या शिवसेनेबरोबर होता. आता कुठे आहेत माहिती नाही. आताही त्यांचे प्रकरण बाहेर आले असून एकएक प्रकरण बाहेर येत आहे, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.