उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले, बॉम्ब बरेच, आता...

उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला  इशारा; म्हणाले, बॉम्ब बरेच, आता...

नागपूर | Nagpur

शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, आमच्याकडे बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत, आता पेटवण्याची गरज आहे. परंतु सीमाभागात लाखो मराठी भाषिकांवर अन्याय होत असून त्यावर ठराव मांडणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्यात असताना लाठ्या काठ्या खाल्ल्या म्हणून तुम्ही आता गप्प बसा असे होत नाही. केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत या मुद्द्यावर उत्तर नाही. हे अनैतिक सरकार असल्याने त्यांच्याकडून नैतिकता अपेक्षित नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, या सरकारने शेतकऱ्यांना (Farmers) उघड्यावर सोडले असून मुख्यमंत्र्यांच्या (CM) दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. मुख्यमंत्री हिंदुत्व मानणारे असल्याने वारंवार देवदर्शनाला जातात. त्यामुळे त्यांना नवस करणे आणि फेडणे यासाठी दिल्लीला जावे लागते. आजचा दिवस गेला म्हणून नवस फेडत असून उद्याचा दिवस नीट जाऊ द्या यासाठी नवस करतात. त्यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे? दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमाप्रश्न आणि महाराष्ट्राचा फायदा काय झाला? अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कुठे पंचनामे झाले? कुठे मदत मिळाली? महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्न आम्ही मांडले आहेत. परंतु त्यावर किती चर्चा होते हे सगळ्यांना माहित असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच सीमावादावर बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. एवढाच काळ किंवा यापेक्षा जास्त काळ सीमाभागातील माणसे मराठीत (Marathi)बोलत आहेत. त्यांनी आंदोलनासह विविध मार्गांनी आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. त्यावर ठरावही मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com