समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनानंतर उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका; म्हणाले, शिवरायांचा...

समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनानंतर उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका; म्हणाले, शिवरायांचा...

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढतांना दिसत आहे. पंरतु, मागील काही दिवसांपासून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.आज आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह विधानावरून भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले आहे...

ते म्हणाले की, महाराष्ट्राची (Maharashtra) सातत्याने अवहेलना होत असून छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणारा माणूस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला बसला, त्यामुळे महाराष्ट्राने नेमके समजायचे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे.

तसेच पुढे महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) बोलतांना ते म्हणाले की, एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद पेटला आहे. पंरतु, महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज आल्यासारखे बोलत आहे. पण आमचे मुख्यमंत्री हे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखे वाचत आहे. कोर्टात याचिका दाखल केलेली असताना तसे त्यांनी बोलले पाहिजे. त्यांना सोलापूर पाहिजे, अक्कलकोट पाहिजे, इतकी हिंमत होती कशी. केंद्रात भाजपचे सरकार (BJP Government) आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्यांचे एकच नेते आहे. आपल्या मिंध्याचे नेते एकेकाळी बाळासाहेब होते, आता कोण मोदी आहे. बोम्मईंचे नेते मोदी आहेत. मग ते इतक्या जोरात बोलताय, मग हे गप्प का? असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi) या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्सप्रेस, एम्स रुग्णालय सारख्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com