धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिंदे गटासह भाजपवर टीका

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिंदे गटासह भाजपवर टीका

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (Shiv Sena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना पक्षाचं पारंपारिक निवडणुक चिन्ह धनुष्यबाण वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तरी निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाचं उध्दव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्याच्या जनतेशी संवाद साधला.

शिवसेना आणि तुमच्या नावाचा संबंध काय? नाव आजोबांनी दिलं, वडिलांनी रुजवलं, मी पुढे घेऊन जात आहे, तुम्ही त्याचाच घात करत आहात, बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेच्या समोर या, स्वत पक्ष काढा, भाजपामध्ये जा. आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको

निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. अनेक घटनातज्ज्ञांनी सांगितलं आहे, घटनेनुसार निकाल लागला तर काय लागणार आहे ते त्यांनीच सांगितलं आहे. जर अपात्र ठरले तर आजचं जे गोठवलंपण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी? माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यादेवता नक्की आपल्याला न्याय देईल ही मला खात्री आहे असे ठाकरे म्हणाले

आपण सहन केलं, पण आता अती होत आहे. स्वत: शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत, हे अती होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळू नये म्हणून खोकेसूरांनी प्रयत्न केले", अशा रोखठोक पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका माडली. आता तर तीन महिने होऊन गेले. मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं. ज्यांना सर्वकाही देवून सुद्धा एक मनामध्ये धुसफूस नाराजी होती, तेही गेले. ठीक आहे. आपण काही बोललो नाही अशातला भाग नाही. पण आपण सहन केलं.संकटातही संधी दडलेल्या असतात, ही संधी मी शोधतोय, त्या संधीचं सोनं करणार हे तर नक्कीच आहे असे ठाकरे म्हणाले

निवडणूक आयोगाने आपल्याला आदेश दिल्यानंतर तात्काळ निवडणूक आयोगाला तीन चिन्हे दिली आहेत. यामध्ये १) त्रिशूळ . २)उगवता सूर्य आणि ३) धगधगती मशाल.

तीन नावं सुद्धा तात्पुरत्या वेळासाठी निवडणूक आयोगाला दिली

१) शिवसेना बाळासाहेब ठाकरे,

२)शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे,

३) उद्धव बाळासाहेब ठाकरे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com