उद्धव ठाकरेंचे अमित शहांवर टीकेचे बाण; म्हणाले, मोगॅम्बो...
मुंबई | Mumbai
देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. काल त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनतर आज उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी ते म्हणाले की, काल पुण्यात (Pune) कोणी आलं होतं, त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. खूपच छान, 'मोगॅम्बो खुश हुआ', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण ज्यांनी हिसकावून घेतलं आहे त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी मैदानात उतरावं आणि निवडणूक लढावी. मी मशाल घेऊन येतो, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. तसेच सध्या जे सुरु आहे ती लोकशाही आहे का? जे सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) बोलतांना ठाकरे म्हणाले की, मी काँग्रेससोबत गेलो नाही, तर भाजपने मला ढकललं आहे. मला हे यासाठी सांगायचं आहे की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये. २०१४ मध्ये मी युती तोडली नव्हती. भाजपने युती तोडली होती. त्यावेळी भाजपला असं वाटलं होतं की, ते स्वतःच्या दमावर सत्ता सांभाळतील, मात्र त्यांना ते जमलं नाही, शेवटी भाजपला आमची मदत घ्यावी लागली, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.