एकनाथ शिंदेंचे बंड अन् उद्धव ठाकरेंचा फडणवीस-शाहांना फोन; ‘वाचा’ नेमकं काय घडलं?

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई । Mumbai

राज्यातील किंबहुना देशातील सर्वात मोठ्या राजकीय बंडामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या सत्तांतरानंतरही या सत्तास्थापनेच्या चर्चा आणि सत्तास्थापनेच्या अलीकले-पलीकडे नेमके काय घडंले हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे…

त्यातच शिंदेगट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) एकत्र येतील का हाही प्रश्न नव्याने समोर आला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वापासून ते दिल्लीपर्यंत फोनाफोनी केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. तसेच एकनाथ शिंदे यांना सोडा, मी सगळा पक्ष घेऊन येतो अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिली होती अशी माहिती देखील मिळाली आहे.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या तत्कालीन एका मंत्र्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना हा फोन केला होता. फोनवरुन उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिदेंची बारगेनिंग पॉवर का वाढवत आहात, थेट आमच्याशी बोला. आपण भाजप-शिवसेनेची (BJP-ShivSena) सत्ता स्थापन करू, असा प्रतिसाद फडणवीसांना दिला होता.

मात्र,आता वेळ निघून गेलेली आहे, आपण एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला फसवू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही थेट अमित शहांसोबत बोला, असे उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले होते.

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी अमित शहा (Amit Shah) यांच्याशी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमित शहांकडून फोन घेण्यात आला नाही. कारण २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी अमित शहांनी मातोश्रीवर फोन केला होता. पण, उद्धव ठाकरेंनी तो कॉल घेतला नव्हता.

यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) फोन केला होता. मात्र, मोदी हे कुठल्यातरी कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी अमित शहांसोबत चर्चा करण्याचे उद्धव ठाकरेंना सूचवले होते. मात्र, शहा यांच्याकडून उद्धव ठाकरेंना बोलण्यास टाळटाळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात (Presidential Election) उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना तीन पर्याय दिले. खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा पहिला पर्याय निवडला.

याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मी भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगितले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *