Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्याच्या सुनावणीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले...

उद्याच्या सुनावणीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार असून या निकालाकडे देशासह संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागले आहे. मात्र, या सुनावणी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी बोलतांना मोठे विधान केले आहे….

- Advertisement -

यावेळी ठाकरे म्हणाले की, उद्या न्यायालयात जे व्हायचे ते होईल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. माझ्यासोबत जनतेच्या भावना जोडल्या आहेत. तसेच लोक निवडणुकांची (Elections) वाट पाहत असून या दललीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे.

या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणूका घ्या म्हटल्या जात आहेत. मात्र निवडणूक घेण्याची यांच्यात हिंमत नाही, असेही ठाकरे म्हणाले. शिवसैनिक आज शपथपत्र घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केले.

दरम्यान, उद्याच्या निकालातून शिवसेना (Shivsena) कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे? अपात्र आमदारांचे (MLA) काय होणार? शिंदे – फडणवीस सरकारचे (Shinde Fadnavis Government) काय होणार? हे स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या