
मुंबई | Mumbai
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केल्यानंतर, या सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा, अर्थमंत्री (Finance Minister) देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठ्या आत्मविश्वासाने मांडला...
येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह समाजातील सर्वच घटकांना कमीअधिक प्रमाणात खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना (Farmer Scheme), सिंचन प्रकल्पांसाठी तरतूद, विमानतळांचे विस्तारीकरण, महिलांना बस प्रवासात सूट, आशा सेविका-अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ, घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांसारख्या असंख्य घोषणांचा पाऊस राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत (Assembly) यंदाचा अर्थसंकल्प वाचताना केला.
मात्र या अर्थसंकल्पातून विरोधकांचे समाधान झाले नसल्याने, विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर “दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला” अशी टीका केली आहे.
तर, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करताना म्हटले आहे की, “शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'गाजर हलवा' आहे.
अशा शब्दात ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून समाचार घेतला. तसेच बहुसंख्य योजना महाविकास आघाडीच्या संकल्पनेतील असून केवळ त्यांचे नामकरण करून नव्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आले आहे अशी टीकाही यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. तर काहींच्या मते हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ घोषणांचा पाऊस आहे.