Saturday, April 27, 2024
Homeजळगावसत्तेच्या लोभापायी उध्दव ठाकरेंनी त्यागले हिंदुत्व

सत्तेच्या लोभापायी उध्दव ठाकरेंनी त्यागले हिंदुत्व

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) काँग्रेस धार्जिणे(Dharjine Congress) बनले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi)सावरकरांचा अपमान (Insulting Savarkar) करतात, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मात्र राहुल गांधींना (Rahul Gandhi) मिठी मारतात. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी माफ केले नसते. सत्तेच्या लोभापायी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे विचार स्विकारले आहेत. आता केवळ पक्षाची घटना बदलणे बाकी आहे. सामनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रिप्ट छापून येते. हिंदुत्वावादी (Hinduism) विचार उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यागल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे.

- Advertisement -

एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र पुन्हा वरणगावला येणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगावात पक्ष संघटन दौर्‍यानिमित्त आले असता, त्यांनी रविवारी वसंत स्मृती भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकास्त्र सोडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, भाजप महानगराध्य दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, प्रभाकर सोनवणे, दीपक साखरे, भैरवी पलांडे, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

यावेळी शिवसेनेवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर लोटांगण घेतात. शरद पवारांनी उध्दव ठाकरेंचा बुध्दीभ्रम केला असून, शिवसेनेला संपविण्याचा घाट आहे. उध्दव ठाकरेंना खरोखरच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाची चिड असेल तर महाविकास आघाडी सोडून बाहेर पडा, असे आव्हानही चंद्रशेखर बानवकुळे यांनी केले.

VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उध्दव ठाकरेंनी उद्योगावर कधीही चर्चा केली नाही. 18 महिने मंत्रालयात आले नाही. त्यांना उद्योगांशी काही देणंघेणंच नव्हतं. उद्योग आणण्यासाठी उद्योजकांशी संवाद साधून अडचणी सोडविणे महत्वाचे आहे. मात्र, उध्दव ठाकरेंनी एकही बैठक घेतली नाही. उद्योगांसाठी पोषक वातावरण केलं नाही. तर उद्योजक महाराष्ट्रात येणार तरी कशाला? उध्दव ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे राज्यातून उद्योग बाहेर पडल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 18 तास काम करुन उद्योजकांच्या समस्या सोडवित आहेत. उद्योगांसाठी आवश्यक साधने पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी मात्र आपल्या कार्यकाळात काय दिलं? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

आक्षेपार्ह वक्तव्याने जळगावात तणाव

राज्यपालांवर बोलण्याचा अधिकार नाही- बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराज देश आणि महाराष्ट्रासाठी आदर्श असून, ते सर्वांच्या ह्रदयात आहेत. महाराजांनी देशाला जाज्वल्य इतिहास दिला आहे. राज्यपालांनी जे काही वक्तव्य केलंय, त्यात त्यांची नेमकी भावना काय होती हे पहावं लागेलं. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता शिवरायांचा आदर करतो. देशात शिवशाहीच असून, महाराजांच्या प्रेरणेतूनच सरकार काम करीत आहे. शिवरायांबद्दल कुठलंही वक्तव्य करताना सांभाळून बोलावं. विरोधकांनी या विषयाला संवेदनशील बनविलं असून, राजकारण करीत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यात अपमान करण्याचा भाव नसावा. राज्यपाल हे संविधानिक पद असून, ते कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यांचे अधिकार मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही, अशीही त्यांनी पुष्टी जोडली.

तालुका पोलिसांकडून गावठी दारुच्या भट्ट्या उद्ध्वस्त

अपमान खपवून घेणार नाही

सावरकरांचा इतिहास प्रेरणादायी असून, त्यांनी देशासाठी खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांवर जे वक्तव्य केलं असून, ते नक्कीच निषेधार्ह आहे. कुठलंही महान कार्य करताना त्यामागे असलेला हेतू महत्वाचा ठरतो. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचे तंत्र दिले आहे. सावरकरांच्या भुमिकेमागे गनिमी कावा होता इतिहासात असे अनेक दाखले आहेत, जिथे देशहितासाठी कधी-कधी माघार घ्यावी लागते. मात्र, यावरुन सावरकर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुणी अपमान करत असेल तर त्याचे समर्थन करणार नाही, असेही त्यांंनी सांगितले.

.

खडसेंनी वंजारी समाजाची माफी मागावी

कुठल्याही नेत्याने बोलताना सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. कुठलाही नेता समाजाच्या पाठिंब्यानेच निवडून येतो. त्यामुळे कोणत्याही समाजावर टीका करणे शोभनीय नाही. एकनाथ खडसेंनी एखाद्या समाजाबद्दल जे विधान केलंय, यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी माफी मागून प्रकरण संपवावे, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले

- Advertisment -

ताज्या बातम्या