उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे |राजकीय
मुख्य बातम्या

उद्धव ठाकरे पुन्हा टॉप ५ मुख्यमंत्र्यात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली

महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती चांगली सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे पुन्हा टॉप ५ मुख्यमंत्र्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. तर ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहे.

‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ अंतर्गत हे सर्वेक्षण केले. त्यात ‌उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक २४ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १५ टक्के मते दुसऱ्या तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसहित पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री सात टक्के मतांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com