Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानायडूंच्या वक्तव्यावर काय म्हणाले, उदयनराजे

नायडूंच्या वक्तव्यावर काय म्हणाले, उदयनराजे

संभाजी ब्रिगेडकडून व्यंकय्या नायडूंचे पोस्टर जाळून निषेध

नवी दिल्ली :

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू venkaiah naidu यांचे वर्तन चुकीचे नाही. त्यांनी घटनेनुसार सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार नवनिर्वाचित भाजप नेते उदयनराजे Udaynraje यांनी देत विरोधकांकडून सुरु असलेल्या आरोपाची हवाच काढून घेतली.

राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा उदयनराजे यांनी दिली होती. ही घोषणा रेकॉर्डवर येणार नाही, असे नायडू यांनी त्यावेळेस सांगितले. घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, राज्यसभेत कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराजांचा अवमान झाला नाही. महाराजांचा अवमान झाले हे म्हणणे हास्यस्पद आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर त्याच क्षणी मी राजीनामा दिला असता.

राऊतांचा भाजपवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. `छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तसेच संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही…जय भवानी! जय शिवाजी!,” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या