Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापुढचा मोर्चा आझाद मैदानात; उदयनराजे कोश्यारींविरोधात आक्रमक

पुढचा मोर्चा आझाद मैदानात; उदयनराजे कोश्यारींविरोधात आक्रमक

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या विधानाचा विरोध करताना अनेक नेत्यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी केलीये.

- Advertisement -

खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा संदेश का दिला? सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने राहावे, यासाठी त्यांनी लढा दिला. मात्र त्याच शिवाजी महाराजांचा अवमान देशात होतोय. या अवमानासाठी आपण गप्प बसणार आहोत का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.

उदयनराजे पुढं म्हणाले की, सर्व राजकीय पक्ष स्वार्थी झाले. महाराजांनी सर्वधर्मियांना एकत्र केला. मात्र राजकीय नेत्यांकडून शिवाजी महाराजांविषयी तेढ निर्माण केली. थोडक्यात सर्वधर्मसमभावाचा विचार स्वार्थासाठी केला जातो. राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात. तर राज्याचे प्रमुख राज्यपाल असतात. त्या राज्यपालाचं मी नाव घेणार नाही. पण ते शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या विधानावर पांघरून घालणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला.

आपलं मन व्यथित झालंय. पण फक्त व्यथित राहून चालणार नाही. जसं तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रकारे पुन्हा एकदा सगळ्यांनी महाराष्ट्रात जाऊन बांधणी करायची आहे. त्यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा, असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या