परीक्षेसंदर्भातील सोशल मीडियावरील पत्रावर उदय सामंत यांचा मोठा खुलाशा

परीक्षेसंदर्भातील सोशल मीडियावरील पत्रावर उदय सामंत यांचा मोठा खुलाशा
उदय सामंत

पुणे(प्रतिनिधी)—

यूजीसीचं (ugc)जे पत्र सोशल मीडीयावर व्हायरल होतंय ते खोटं आहे.त्या पत्रावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करतानाच लसीचे दोन डोस ज्या विद्यार्थ्याचे झालेत त्यांना ऑफलाईन परीक्षा देता येईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे झाले नसतील त्यांना ऑनलाईन परीक्षा (online exam)देता येतील असे राज्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant)यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यानी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

सामंत म्हणाले, दोन्ही पर्याय परीक्षेसाठी उपलब्ध आहेत. मात्र जे यूजीसीचं पत्र सोशल मीडीयवर व्हायरल होतंय ते खोटं आहे.त्या पत्रावर विश्वास ठेऊ नका. ज्या त्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागानं निर्णय घेतला आहे तशा परीक्षा होतील. कोल्हापूरातील केआयटी महाविद्यालयात जो गोंधळ झाला त्यात मला हस्तक्षेप करावा लागला.

राज्य शासनाने कधीही ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण द्यावेत अशी भूमिका घेतली नाही. कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूप आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत
या फोटोंनी सोनाली कुलकर्णीचे खुललं सौंदर्य

दरम्यान, वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात अध्यक्षीय समिती नेमली आहे. मात्र आम्ही 8 दिवसात जो व्हेरीयंट पसरतोय त्याची माहिती घेतोय. तिसरी लाट येईल का ? तज्ञांकडून मतं मागवली आहेत. मात्र जर पुन्हा क्वारंटाईन सेंटरसाठी वसतिगृह लागली तर करणार काय करणार? त्यामुळे शांतपणे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडा भरती परीक्षा पेपर फुटण्याचा प्रयत्न झाल्याने परीक्षा रद्द झाली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली कारण त्याला बेस आहे. काही जणांना अटक केली आहे, मात्र ज्या काही परीक्षा होतायेत त्या अतिशय पारदर्शकपणे व्हायला हव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.